Budget 2023 : मोदी सरकारने अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून टॅक्स स्लॅब बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. जुनी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर आकारण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात म्हणाल्या की, नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी हीच सूट ५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती.
नवीन कर
केंद्र सरकारने कर प्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे. 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर आकारण्यात येणार आहे. 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर आकारण्यात येणार आहे, 9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर आकारण्यात येणार आहे, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर आकारण्यात येणार आहे आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर आकारण्यात येणार आहे.
नवीन टॅक्स स्लॅब
0 ते 3 लाख रुपये उत्पन्न – शून्य,
3 ते 6 लाख रुपये उत्पन्न – 5% कर
6 ते 9 लाख रुपये उत्पन्न – 10% कर
9 ते 12 लाख रुपये उत्पन्न – 15% कर
12 ते 15 लाख रुपये उत्पन्न – 20% कर
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न– 30% कर