Steel and Cement Price : जर तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच चांगली संधी आहे. कारण कमी बजेटमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर साकारू शकता. स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. स्वस्त दरात स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंटचे दर खूप घसरले आहेत. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांना ही एक चांगली संधी आहे. तसेच ज्यांना घर बांधणे शक्य नाही असे लोक सरकारच्या घरकुल योजनेचा देखील लाभ घेऊन पक्के घर बांधू शकतात.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
घर बांधण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर ते कमी खर्चात पूर्ण होऊ शकते. कारण घर बांधताना स्टील आणि सिमेंट हे दोन साहित्य खरेदी करताना अधिक पैसे खर्च होत असतात. सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी झाल्याने हे खरेदी करताना पैशांची बचत होऊ शकते.
गेल्या काही महिन्यापासून स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ उतार कायम आहे. कधी किमती वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत. सध्या स्टीलच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे तर सिमेंटचेही दर कमी झाले आहेत.
लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या दिवसांत बांधकाम क्षेत्रातील कामे तेजीमध्ये असतात त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत देखील वाढ होते आणि दरही वाढतात. पण सध्या मागणीत घट असल्याने दरही कमी आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना पैशांची मोठी बचत होईल.
गेल्या वर्षी स्टीलचे दर ७० हजारांपेक्षा जास्त गेले होते. तर सिमेंटचे दर ४०० रुपये प्रति बॅगच्या पुढे गेले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे अशक्य होत होते. मात्र सर्वसामान्य नागरिक कमी खर्चात घर बांधू शकतात.
स्टीलचे दर
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51500 रुपये प्रति टन 13-मार्च-23
जालना महाराष्ट्र TMT 12 mm 55500 रुपये प्रति टन 13-मार्च-23
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन 13-मार्च-23
चेन्नई तामिळनाडू TMT 12mm 54000 रुपये प्रति टन 13-मार्च-23
दिल्ली दिल्ली TMT 12mm 53800 रुपये प्रति टन 13-मार्च-23
सिमेंटचे नवीन दर
सिमेंटच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. सध्या सिमेंटचा भाव प्रति बॅग 330 रुपये इतका आहे. गेल्या वर्षी सिमेंटचे दरही 400 रुपये प्रति बागवर गेले होते. त्यामुळे आता तुम्ही स्वस्तात सिमेंट खरेदी करून घर बांधू शकता.