PF Interest Money : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची कंपनी तुमच्या पगारातून पीएफ साठी काही रक्कम कापत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. मोदी सरकारकडून पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठरविक रक्कम कापली जाते तीच रक्कम त्याच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. या पैशावर सरकारकडून व्याजदर देखील दिले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.
अलीकडेच, अशी बातमी आली होती की 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF चे व्याज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले नाही.
या आर्थिक वर्षासाठी सरकारने ८.१ टक्के व्याजदर निश्चित केला होता. याबाबत काही खासदार आणि कर्मचारी संघटनांनी बराच वेळ आवाज उठवला होता. यावर केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत उत्तर दिले होते.
व्याज जमा करणे ही निरंतर प्रक्रिया आहे
लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, EPF (EPFO) खात्यात व्याज जमा करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. नवीन सॉफ्टवेअर लागू झाल्यानंतर विहित पद्धतीनुसार व्याज जमा केले जात आहे. टीडीएसशी संबंधित नवीन नियमांमुळे पीएफ खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया संथ असल्याचेही त्यांनी सांगितले.
९८ टक्के खातेदारांकडे पैसे आले
2021-22 या आर्थिक वर्षाचे पीएफ खात्यातील पैशावरील व्याज सुमारे ९८ टक्के लोकांच्या खात्यात जमा केले आहे. यासाठी सरकारकडून ८.१ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. जर तुमचे पीएफ पैशावरील व्याज जमा झाले आहे की नाही हे तपासायचे असेल तर तुम्ही ते सोप्या पद्धतीने तपासू शकता.
पीएफ शिल्लक कशी तपासायची
सर्वप्रथम EPFO पोर्टल www.epfindia.gov.in वर जा.
येथे ई-पासबुक पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेजवर UAN वर क्लिक करा आणि पासवर्ड टाका.
खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
लॉगिन केल्यानंतर, सदस्य आयडी पर्याय निवडा, येथे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पासबुक मिळेल.
यामध्ये तुम्ही नुकतेच आलेले व्याज इत्यादी रक्कम तपासू शकता.