7th Pay Commission Update : देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षातील महागाई भत्ता केंद्र सरकार लवकरच वाढवू शकते. नवीन वर्षातील महागाई भत्ता वाढण्यासाठी केंद्र सरकारकडून कागदोपत्री कार्यवाही केली जात आहे.
येत्या १० दिवसांत केंद्र सरकारकडून DA वाढीबाबात घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
१ मार्च २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत चर्चा झाली असून त्याला ग्रीन सिग्नल देखील मिळाला आहे.
मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतेही परिपत्रक काढले नाही किंवा त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण पुढील १० दिवसांत केंद्र सरकार DA वाढीची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के आहे. तसेच महिला DA वाढ देखील ४ टक्क्यांनी करण्यात आली होती.
20 मार्च 2023 पर्यंत केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. होळीपूर्वी केंद्र सरकार DA वाढीची घोषणा करणार असल्याची चर्चा होती मात्र आता चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीला केंद्र ग्रीन सिग्नल देऊ शकते.
7 व्या वेतन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सध्या ते 2.57 टक्के आहे. केंद्राकडून हा आकडा 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. फिटमेंट फॅक्टरमध्ये अशी वाढ जाहीर झाल्यास, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सध्याच्या 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.