Farmer Loan Waiver News : देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना सादर करत आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारकडून कर्जमाफी देखील केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.
अनेक राज्यात कर्जला कंटाळून शेकडो शेतकरी आत्महत्या करत असतात. त्यामुळे सरकारकडून कर्जमाफी करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. आता सरकारकडून राज्यातील २.३७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
शेतकरी शेतीसाठी अनेकदा कर्ज घेत असतात. पण अवकाळी पाऊस, जास्तीचा पाऊस किंवा कमी पावसाचे प्रमाण यामुळे शेतकऱ्यांचे पीक चांगले येत नाही. तसेच पिक चांगले आले तर त्याला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तोट्यात जातो आणि शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही.
शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने “किसान कर्ज माफी” योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल आणि शेतकरी कर्जातून मुक्त होईल.
ही योजना भारत सरकारने उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत, बँकांकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल.
या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील सुमारे 2.37 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. उत्तर प्रदेश सरकारने या योजनेला “किसान कर्ज माफी योजना” असे नाव दिले आहे. सरकारच्या या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
1. बँकांकडून कर्ज घेतलेल्या उत्तर प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
2. ही योजना सुरू झाल्याने राज्यातील शेतकरी स्वावलंबी होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
3. या योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचेच कर्ज माफ होणार आहे.
4. या योजनेमुळे उत्तर प्रदेशातील शेतकरी सक्षम होणार असून त्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे.
5. ही योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा सरकारच्या धोरणांवरचा विश्वास वाढणार आहे.
6. कर्जमाफी योजनेमुळे शेतकरी सक्षम होणार आहेत.
सरकारने घेतलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होणार असून शेतकरी कर्जाच्या तणावातून मुक्त होतील आणि आत्महत्येचे प्रमाण कमी होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.