मोठी बातमी! भारतीय संघाच्या या खेळाडूने घेतली निवृत्ती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-भारतीय संघाचा विकेट किपर पार्थिव पटेल याने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली.

माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभारी असल्याचे पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 35 वर्षीय पार्थिव पटेलने 18 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 25 कसोटी सामने, 38 एकदिवसीय सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून 194 क्रिकेट सामने खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. 8 ऑगस्ट 2002 मध्ये कसोटी सामन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. तर 8 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेत शेवटचा कसोटी सामना खेळला.

तर 4 जानेवारी 2003 मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि 27 जुलै 2004 मध्ये श्रीलंके विरुद्ध अंतिम एकदिवसीय सामना खेळला.

2004 साली दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातली आपली जागा गमावली. भारतीय संघाकडून संधी मिळत नसली तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव खेळत होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment