Steel and Cement New Rate : जर तुम्ही सध्या घर बांधण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण स्टील आणि सिमेंटचे दर सध्याच्या काळात सामान्य स्थितीवर आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना मोठे पैसे वाचू शकतात.
प्रत्येकाचे छोटे का होईना पण स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न असते. पण वाढती महागाई पाहता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या होत्या. पण सध्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीत घट झाल्याने त्यांच्या किमतीही उतरल्या आहेत.
पण सध्या जरी किमती कमी असल्या तरी लवकरच स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण उन्हाळ्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कमला गती येते आणि स्टील, सिमेंटच्या मागणीत वाढ होऊन त्यांच्या किमती देखील वाढतात.
पण स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्यापूर्वी तुम्ही ते खरेदी करून स्वप्नातील घर बांधत असताना मोठ्या पैशांची बचत करू शकता. सध्या स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण होत आहे.
स्टील किंमत
गेल्या काही महिन्यांपूर्वी स्टील आणि सिमेंटच्या किमती 75 हजार रुपये प्रतिटन इतकी झाली होती. मात्र आता स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबई TMT 12mm 56000 रुपये प्रतिटन 24-February-23
जालना TMT 12mm 55300 रुपये प्रतिटन 24-February-23
नागपूर TMT 12mm 51000 रुपये प्रतिटन 24-February-23
सिमेंटच्या किमती
गेल्या वर्षीच्या तुलनेत सिमेंटच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. सिमेंटचे दर प्रति बोर ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता सिमेंटच्या दरात 60 रुपयांची घट दिसून येत आहे. सध्या प्रति बॅग ३३५ रुपये दर चालू आहे.
विटांचे भावही कमी झाले
घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या विटांची किंमत 6000 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर या विटांच्या किमतीही खाली आल्या आहेत. फरशा, वाळू, धूळ या बांधकाम साहित्याच्या किमतीही कमी झाल्या आहेत.