Budget 2023 : करदात्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल, आयकरात मिळणार एवढी सूट…

Ahmednagarlive24 office
Published:

Budget 2023 : केंद्र सरकारकडून २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा ७५वा अर्थसंकल्प जाहीर करत आहे. या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये कपात करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. जुनी करप्रणाली रद्द करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात म्हणाल्या की, नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी हीच सूट ५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून करदाते या निर्णयाची वाट पाहत होते. आता अर्थसमंत्र्यांनीच अर्थसंकल्पात याबाबत घसोहन केली आहे.

आयकर

आयकर भरणाऱ्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. प्राप्तिकराच्या संदर्भात, अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी ही सूट ५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती. यासोबतच आयकर स्लॅबमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. पगारदारांना याचा मोठा फायदा होणार आहे.

जुना आयकर स्लॅब

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की 2020 मध्ये, मी 2.5 लाख रुपयांपासून सुरू होणार्‍या 6 उत्पन्न स्लॅबसह नवीन वैयक्तिक आयकर व्यवस्था सुरू केली आहे. आता या प्रणालीतील कर रचना बदलण्याचा, स्लॅबची संख्या 5 पर्यंत कमी करण्याचा आणि कर सवलतीची मर्यादा 3 लाख रुपये करण्याचा माझा प्रस्ताव आहे.

नवीन टॅक्स स्लॅब

नवीन कर दर रु. 0 ते 3 लाख – शून्य,
रु. 3 ते 6 लाख – 5%
रु. 6 ते 9 लाख – 10%
रु. 9 ते 12 लाख – 15%
रु. 12 ते 15 लाख – 20%
15 लाखांपेक्षा जास्त – 30% कर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe