PNB New Rule : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण आता बँकेकडून आर्थिक व्यवहार प्रणालीमध्ये बदल केला आहे. बँकेने नियमांत केलेल्या बदलामुळे ग्राहकांना मोठा झटका मानला जात आहे.
बँकेने जरी ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असला तरी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पंजाब नॅशनल ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
चेक पेमेंट नियमांमध्ये बदल
पंजाब नॅशनल बँकेकडून चेक पेमेंट प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे. चेक पेमेंटची नवीन प्रणाली बँकेकडून लागू करण्यात आली आहे. ग्राहकांची चेकद्वारे आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
PNB ने आपले नियम बदलताना म्हटले आहे की जर ग्राहकांनी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंट केले तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) आवश्यक करण्यात आले आहे.
जुना नियम काय होता?
बँकेकडून नवीन चेक प्रणाली नियम 5 एप्रिल 2023 नंतर लागू केला जाणार आहे. यापूर्वी १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशावर पीपीएस अनिवार्य होते. मात्र, नव्या नियमानंतर ग्राहकांना आणखी सुरक्षितता मिळणार असून, त्यांची फसवणूक बऱ्याच अंशी टाळता येणार आहे.
बँकेचे म्हणणे आहे की ग्राहक चेकचे तपशील ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंगद्वारे देऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
PPS म्हणजे काय?
पंजाब नॅशनल बँकेकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ग्राहकांना थोडी अडचण होऊ शकते. मात्र हा निर्णय ग्राहकांच्या हितासाठीच असल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे.
ही NPCI ने विकसित केलेली प्रणाली आहे. या अंतर्गत, बँक खातेदारांना ठराविक रकमेसाठी धनादेश जारी करताना आवश्यक तपशीलांची पुष्टी करणे बंधनकारक आहे.
या अत्यावश्यक तपशीलांमध्ये नाव, पत्ता, खाते क्रमांक, चेक नंबर, चेक अल्फा कोड, इश्यू तारीख तपासणे इत्यादींचा समावेश आहे. धनादेशाची खात्री झाल्यानंतरच पुढील व्यक्तीला पैसे दिले जातील.