उत्तरप्रदेश मध्ये भाजपाला २५० हून अधिक जागा मिळणार : वसंत लोढा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- पंतप्रधान मोदी व योगी या जोडीने उत्तरप्रदेश मध्ये केलेल्या कायापालट मुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला २५० हून अधिक जागा मिळणार आहेत.

हिंदू बरोबरच मोठ्याप्रमाणावर मुस्लीम नागरिक व महिलांचा वाढता प्रतिसाद भाजपाच्या उमेदवारांना मिळत आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष व कॉंग्रेसचा सुपडा साफ होईल असे सकारात्मक वातावरण उत्तरप्रदेश मध्ये निर्माण झाले आहे,

असे प्रतिपादन ज्येष्ठनेते वसंत लोढा यांनी लखनऊ येथे केले. उत्तरप्रदेश मध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकी मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नगर शहरातील भाजपच्या पदाधीकारींची निवड भाजपा प्रदेशा कडून करण्यात आली आहे.

यामध्ये भाजपाचे माजी शहर अध्यक्ष ज्येष्ठनेते वसंत लोढा, उपाध्यक्ष संतोष गांधी, युवा मोर्चाचे मल्हार गंधे व उपाध्यक्ष सिद्धेश नाकाडे आदी पदाधिकारी उत्तरप्रदेश मधील अमेठी जिल्ह्यातील गौरी गण मतदार संघ व लखनऊ उत्तर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करत मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe