Steel and Cement Rate : प्रत्येकाचे स्वतःचे पक्के घर असण्याची इच्छा असते. पण काही कारणास्तव ते घर अनेकांना बांधता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत.
स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाल्याने ज्यांचे घर बांधण्यासाठी बजेट कमी आहे तेही घर बांधू शकतात. स्टील आणि सिमेंट हे घर बांधण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च होतात.
गेल्या काही दिवसांपूर्वी स्टीलचे दर ७० हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट खरेदी करताना दिलासा मिळत आहे. कारण स्टीलचे दर ५५ हजार रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे पैशांची मोठी बचत होऊ शकते.
देशातील प्रत्येक शहरात स्टील आणि सिमेंटचे दर हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुमच्या शहरातही दर वेगळे असू शक्तात. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर झाला आहे. त्यामुळे अनके वस्तू महाग झाल्या आहेत.
स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उतार
स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये सतत चढ उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर खूपच वाढले होते. त्यामुळे घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडले होते. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे.
स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ झाली की त्यांचे दर देखील वाढत असतात. पण सध्या बांधकाम क्षेत्रातील कामाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दरही कमी झाले आहे.
सध्या स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. स्टील आणि सिमेंटचे दर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पाहू शकता.
गेल्या काही दिवसांपूर्वी सिमेंटचे दर ४०० रुपये प्रति बॅगच्या पुढे गेले होते. मात्र सध्या सिमेंट ३४० रुपये प्रति बॅग दराने मिळत आहे. तसेच स्टील देखील खूप स्वस्त झाले आहे.
महाराष्ट्रातील स्टीलचे दर
जालना महाराष्ट्र TMT 12 mm 55500 रुपये प्रति टन 6-मार्च-23
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन 6-मार्च-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51500 रुपये प्रति टन 6-मार्च-23