Steel and Cement Price : घर बांधण्यासाठी लागणारे साहित्याच्या दरात सध्या घसरण सुरु आहे. त्यामुळे जर सध्याच्या दरात घर बांधले तर पैशांची मोठी बचत होईल. स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण सुरूच आहे. हे दोन घटक घर बांधण्यासाठी महत्वाचे आहेत.
सर्वसामान्य नागिरकांचे छोटे का होईना पण स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. स्टील आणि सिमेंटचे दर सध्या सामान्य पातळीवर आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट त्वरित खरेदी करू शकता.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि अशा दिवसांत बांधकाम क्षेत्रात कमी प्रमाणात कामे चालू असतात. तसेच पावसाळ्यातही कमी प्रमाणात कामे चालू असतात. मात्र उन्हाळ्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामे वाढतात आणि स्टील आणि सिमेंटची मागणी देखील वाढते.
स्टील आणि सिमेंटची मागणी वाढल्याने दरात देखील मोठी वाढ होते. मात्र सध्या स्टील आणि सिमेंटचे दर कमी असल्याने तुम्ही ते खरेदी करून स्वप्नातील घर साकारू शकता.
उन्हाळा सुरु होताच स्टील आणि सिमेंटचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या महागाईत स्टील आणि सिमेंटचे दर देखील उच्च पातळीवर जाऊ शकतात. त्यामुळे कमी दरात स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
उन्हाळ्यात स्टील आणि सिमेंटचे दर वाढल्याने तुमचे घर बांधायचे बजेट बिघडू शकते. या दिवसांत तुम्हाला स्टील आणि सिमेंट खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
स्टील आणि सिमेंटच्या नवीनतम किमती
सध्याच्या स्थितीत स्टील आणि सिमेंटचे दर प्रत्येक शहरात वेगवेगळे पाहायला मिळतील. सध्या स्टीलचा दर 65000 रुपये प्रति टन सुरु आहे. तर सिमेंटचे दर 340 ते 400 रुपये प्रति बॅग सुरु आहे. उन्हाळ्यात स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.