Steel and Cement Price Update : कमी बजेटमध्ये बांधा स्वप्नातील राजवाडा! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे दर

Steel and Cement Price Update : स्टील आणि सिमेंटचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. जर तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सध्याच्या घडीला तुम्ही कमी बजेटमध्ये देखील घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःचे छोटे का होईना पण पक्के घर असावे. यासाठी अनेकजण रात्र न दिवस कष्ट करून घर बांधण्यासाठी पैसे जमा करत असतात. पण स्टील आणि सिमेंटचे दर वाढल्याने अनेकांना ते बांधणे शक्य नव्हते. पण आता ते शक्य झाले आहे.

घर बांधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती घसरल्या आहेत. स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत मोठी घसरण

गेल्या वर्षी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे अनेकांना घर बांधणे शक्य नव्हते. स्टील ७० हजार रुपये प्रति टनाच्या पुढे गेले होते तर सिमेंट ४०० रुपये प्रति बॅगच्या पुढे गेले होते. त्यामुळे घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होत होते.

स्टीलच्या नवीन किमती जाणून घ्या

नागपूर     महाराष्ट्र       TMT 12mm      51500 रुपये प्रति टन    14-मार्च-23
जालना     महाराष्ट्र       TMT 12 mm     55500 रुपये प्रति टन    14-मार्च-23
मुंबई        महाराष्ट्र       TMT 12mm      56000 रुपये प्रति टन    14-मार्च-23
चेन्नई        तामिळनाडू  TMT 12mm      54000 रुपये प्रति टन    14-मार्च-23
दिल्ली      दिल्ली          TMT 12mm      53800 रुपये प्रति टन    14-मार्च-23

जाणून घ्या सिमेंटच्या नवीन किमती

अल्ट्राटेक सिमेंट 330 रुपये प्रति बॅग
एसीसी सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट 410 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट 350 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट 330 रुपये प्रति बॅग

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe