Steel and Cement Price : प्रत्येकाचे छोटे का होईना एक स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडल्याने अनेकांना ते बांधणे अवघड जाते. जर तुम्हीही स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट आणि स्टीलच्या दरात मोठे बदल होत आहेत. स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता स्टील आणि सिमेंट कमी दरात खरेदी करता येऊ शकते.
स्वप्नातील घर बांधणे झाले सोपे
घर बाधत असताना स्टील आणि सिमेंट हे दोन घटक खूप महत्वाचे असतात. मात्र त्याचे बाजार वाढल्याने अनेकांना ते बांधणे कठीण होऊन जाते. त्यामुळे अनेकजण घर बांधण्याची टाळाटाळ करत असतात.
घर बांधण्यासाठी संपूर्ण बजेटचा विचार केला जातो. मात्र बजेटनुसार पाहिले तर घर बांधणे शक्य होते. पण जर अचानक स्टील आणि सिमेंटचे दर वाढले तर बजेट कोलमडते आणि घर बांधण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. मात्र सिमेंट आणि स्टीलचे दर कमी झाल्याने घर बांधणे सोपे झाले आहे.
स्टील आणि सिमेंटच्या दरात दररोज बदल होत आहे
स्टीलच्या दरात चढ-उतार सुरू झाल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्या स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उताराची स्थिती आहे, परंतु काही काळापासून स्टील आणि सिमेंटच्या किमतीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत, या वेळी घर बांधण्याचा विचार करणार्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. घर बांधण्यापूर्वी कोणतीही व्यक्ती किंमत पाहते आणि त्यानंतरच घर बांधण्याचा निर्णय घेते.
स्टील आणि सिमेंटच्या किमतीत घसरण
सध्या सिमेंट आणि स्टिलचे दर सामान्य स्थितीवर आहेत. त्यामुळे तुमच्या बजेटमधील घर बांधण्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. स्टीलच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास दर 65,000 रुपये प्रति टन इतका आहे. आणि सिमेंटचे दर 335 रुपये प्रति पिशवी इतका सुरु आहे.