अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- आपली स्वतःची कार असण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची ही चांगली संधी आहे. Hyundai India आपल्या काही मोटारींवर डिस्काउंट देत आहे. यात आपण दीड लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. हे डिस्काउंट एक्सचेंज आणि रोख व्यतिरिक्त लॉयल्टी बोनस च्या स्वरूपात आहेत.
याशिवाय आपला व्यवसाय कोणता आहे आणि आपण कुठे काम करता यावर कॉर्पोरेट सूट देखील दिले जात आहेत. हुंदाई इंडिया आपल्या ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारवर दीड लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. ह्युंदाईची एंट्री लेव्हल कार सॅन्ट्रो वरही 50 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
ह्युंदाईच्या काही गाड्यांवर थेट 30 हजार रुपयांचा कॅश बेनेफिटही मिळत आहे, या व्यतिरिक्त जर कोणी आपली कार एक्सचेंज करत असेल तर त्याला अतिरिक्त 15 हजार रुपयांची सूट मिळेल. 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट लाभही मिळू शकतो.
कंपनीच्या या ऑफर फक्त या महिन्यासाठी म्हणजेच मार्च 2021 अखेरपर्यंत उपलब्ध आहेत. ह्युंदाई आय 20, व्हर्ना, क्रेटा, व्हेन्यू आणि टक्सन या सर्वाधिक विक्री असलेल्या मोटारींवर कंपनी कोणतीही सवलत देत नाही.
Hyundai India च्या ऑफर्स –
- – ह्युंदाईच्या एंट्री लेव्हल कार सॅंट्रोवर तुम्हाला 50 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
- – ह्युंदाईच्या निओस गाड्यांवरही 60 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, ज्यात 45 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट सवलत यांचा समावेश आहे. ही ऑफर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांसाठी आहे.
- – ह्युंदाई ऑरावर 70 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यात 50 हजार रुपयांचा थेट कॅश बेनेफिट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉरपोरेट डिस्काउंट आहे.
- – ह्युंदाई इलेंट्राच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही ऑप्शंस वर कंपनी डीलर्स1 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहेत. यात 70 हजार रुपयांचा थेट कॅश बेनेफिट आणि एक्सचेंजच्या बदल्यात तुम्हाला 30 हजार रुपयांचा अतिरिक्त बेनेफिट देखील मिळेल.
- – हुंडई कोना ईव्हीवर खरेदीदारांना दीड लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|