Maruti Car Offers : बंपर ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर मिळतेय ६४००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, ऑफर फक्त ३१ मार्चपर्यंत

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Car Offers : मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतीय बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. तसेच देशात सर्वाधिक कार विकणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. तसेच आता कंपनीकडून ३१ मार्च अगोदर कार खरेदी करणाऱ्यांना ६४००० रुपयांपर्यंतची मोठी सूट दिली जात आहे.

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. त्यामुळे या महिन्यात खूप मोठी आर्थिक उलढाल होत असते. जर तुम्ही मारुती सुझुकीची कार खरेदी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

मारुती सुझुकीच्या WagonR, Swift, Alto K10, S-Presso, Celerio, Alto 800 आणि Dzire या कारवर एकूण 64,000 रुपयांपर्यंतच्या ऑफरसह सूट दिली जात आहे, जी 31 मार्चपर्यंत वैध आहे.

मारुती कारवर ऑफर

— मारुती वॅगनआर – 64000 रुपये सूट
— मारुती स्विफ्ट – 54,000 रुपये सूट
— मारुती अल्टो K10 – 49,000 रुपये सूट
— मारुती एस-प्रेसो – 49,000 रुपये सूट
— मारुती सेलेरियो – 44,000 रुपये सूट
— मारुती अल्टो 800 – 38,000 रुपये सूट
— मारुती डिझायर – 10,000 रुपये सूट

WagonR वर सर्वात मोठी ऑफर

ग्रहकांचीआवडती कार WagonR वर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. भारतामध्ये WagonR या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ६४ हजार रुपयांची सूट या कारवर दिली जात आहे.

तर मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या ऑफरमध्ये रोख सवलत तसेच एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांचाही समावेश आहे. येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की या ऑफर शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकतात. म्हणूनच, कार खरेदी करण्यापूर्वी, डीलरशिपवर त्यांच्याबद्दल योग्यरित्या जाणून घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe