Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिक लोकप्रिय आहेत. मारुतीच्या कार सर्वाधिक मायलेज आणि कमी किंमत असल्याने ग्राहकही या गाड्यांना प्रचंड प्रतिसाद देत आहेत. जर तुम्हीही स्विफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी पैशात खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
स्विफ्ट कारला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. तसेच अजूनही ही कार भारतीयबाजारात अधिक लोकप्रिय आहे. मारुती सुझुकीच्या कारचा खप हा सर्वाधिक आहे. सर्वाधिक कारचा खप करणारी भारतातील एकमेव कंपनी ही मारुती सुझुकी आहे.
जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि पैसे कमी असतील तर काळजी करू नका. कारण आता तुमच्या बजेटमध्ये तुम्ही कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. बाजारात अनेक सेकंड हँड कार उपलब्ध आहेत.
1. Swift VDI
स्विफ्ट VDI हे लाइनअपमधील टॉप मॉडेल आहे आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 6.98 लाख रुपये आहे. हे 28.4 kmpl चा मायलेज देते. मारुती स्विफ्ट VDI मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे आणि 6 रंग पर्यायांमध्ये ऑफर केली आहे – पर्ल मेटॅलिक मिडनाईट ब्लू, मेटॅलिक मॅग्मा ग्रे, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, सॉलिड फायर रेड, पर्ल मेटॅलिक ल्यूसेंट ऑरेंज आणि पर्ल आर्क्टिक व्हाइट रंगामध्ये उपलब्ध आहे.
ही कार फरीदाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर ही कार 2009 ची आहे. आतापर्यंत या पेट्रोलवर चालणाऱ्या कारने 79331 किलोमीटरचे अंतर कापले आहे. ही कार तुम्ही फक्त 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
2. Swift ZXI
मारुती स्विफ्ट ZXI कार खरेदी करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर कमी खर्चात कार खरेदी करू शकता. बाजारात या कारची किंमत 7.56 लाख रुपये आहे. ही कार 22.38 kmpl मायलेज देते.
तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती गुरुग्राममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत एकूण 76242 किमी अंतर कापले आहे. ही कार तुम्ही फक्त 1 लाख 25 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या कारचे मॉडेल 2009चे आहे.
3. स्विफ्ट LXI
Swift LXI कार ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या बाजारात तिची किंमत 5.99 लाख रुपये आहे. तसेच ही कार 22.38 kmpl मायलेज देते.
फरिदाबादमध्येही तुम्हाला दुसरी कार मिळेल. या कारचे मॉडेल 2010 मधीलआहे. पेट्रोलवर चालणाऱ्या कारने आतापर्यंत एकूण 129 909 किमी अंतर कापले आहे. ही कार तुम्ही फक्त 1 लाख 55 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.