Motorola E40 Smartphone : आजकाल लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजण स्मार्टफोन वापरत आहेत. आजच्या युगात सर्वजण स्मार्टफोन वापरत असल्याने स्मार्टफोनची मागणी देखील खूप वाढली आहे. Motorola E40 स्मार्टफोनवर भन्नाट सूट मिळत आहे.
ई-कॉमर्स वेबसाइटमुळे घरबसल्या काहीही खरेदी करणे सोपे झाले आहे. यावर तुम्ही १० हजारापासून ते लाखो रुपयापर्यंत स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टवर एक मस्त ऑफर लागली आहे. त्यावरून तुम्ही Motorola कंपनीचा स्मार्टफोन अवघ्या काही रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टवर फक्त 599 रुपयांमध्ये Motorola E40 स्मार्टफोन मिळत आहे. यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेही स्मार्टफोन मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे एक चांगली संधी आहे.
सवलत आणि ऑफर
Motorola E40 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर तो डिस्काउंटसह विकला जात आहे. तुम्हाला या स्मार्टफोनच्या किमतीवर 24 टक्के म्हणजेच 2,700 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
हा फोन फ्लिपकार्टवर 8,599 रुपयांना विकण्यात येत आहे. यावर इतर ऑफर्स देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते.
एक्सचेंज ऑफर
जर तुम्ही हा स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचा जुना मोबाईल देखील एक्सचेंज करावा लागेल. तुमचा जुना मोबाईल चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला यावरही चांगली ऑफर मिळू शकते. 7,700 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह ही ऑफर देण्यात आली आहे.
तपशील
Motorola Moto E40 मध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 48MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि UNISOC T700 प्रोसेसर देण्यात आला आहे.