Car Loan : अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न असते. मात्र कारच्या किमती अधिक वाढल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. कार घेण्यासाठी मोठी रक्कम लागते. मात्र ती अनेकांकडे नसते. मात्र आता तुम्ही कार लोन घेऊन तुमचे कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.
कार खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे भरावे असे काहीही नाही. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही कार खरेदीसाठी फायनान्स करू शकता. त्यानंतर तुम्ही सहजपणे कार खरेदी करू शकता.

भारतातील बहुतांश बँका आणि NBFC कार कर्जाची सुविधा देतात. तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे कारच्या किमतीपेक्षा काही ठराविक रक्कम असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला कार खरेदीसाठी पूर्णपणे लोन दिले जात नाही.
फायनान्स कंपनीकडून काही ठराविक रक्कम ठरवलेली असते तेव्हडीच रक्कम तुम्हाला लोन म्हणून दिली जाते. राहिलेली रक्कम भरून तुम्ही कार तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता.
कार कर्ज म्हणजे काय?
जर तुम्हाला नवीन कार घेईची आहे आणि त्या कारची रक्कम १० किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि तुमच्याकडे फक्त ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे. तर तुम्ही ती रक्कम डाऊनपेमेंटच्या स्वरूपात भरून कारवर कर्ज घेऊ शकता. कारवर घेतलेले कर्ज तुम्ही दरमहा हफ्त्याने भरू शकता.
कार कर्ज कोण घेऊ शकते?
कार घेण्यासाठी तुम्हाला त्यावर कर्ज घेईचे असेल तर तुमच्याकडील उत्पन्नाचा स्रोत काय आहे हे तपासले जाते. कार कर्ज भरण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे आगोदर तपासले जाते.
जर तुमचा काही व्यवसाय असेल किंवा दरमहा नोकरीचे पैसे बँक खात्यात जमा होत असतील बँकेकडून तुमचा व्यवहार तपासाला जातो. यानंतर तुम्हाला लगेच कारवर कर्ज मिळू शकते.
कार कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र इत्यादी ओळखीचा पुरावा.
रहिवासी पुरावा जसे की मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल इ.
तुमचे वय दर्शविणारे प्रमाणपत्र
कार पेपर
तीन महिन्यांची पगार स्लिप (काही बँका किंवा NBFC जुन्या पगाराच्या स्लिप देखील मागू शकतात.)
मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट (काही बँका किंवा NBFC जुन्या बँक स्टेटमेंटची मागणी करू शकतात.)
रिटर्न फॉर्म किंवा उत्पन्नाचा पुरावा
कारवर किती टक्के कर्ज मिळू शकते?
जर तुम्हीही कारवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला १०० टक्क्यांमधील ३० टक्के रक्कम तयार ठेवावी लागेल. कारण कोणत्याही फायनान्स संस्थेकडून ७० ते ८० टक्केच कर्ज दिले जाते.
जर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत चांगला असेल आणि सिबिल स्कोर ८०० पेक्षा जास्त आहे. अशा लोकांना बँकेकडून पूर्ण १०० टक्के कर्जाची ऑफर दिली जाते. जर तुमच्याकडील उत्पन्नाचा स्रोत मजबूत नसेल तर तुम्ही ३० टक्के रक्कम तयार ठेवा.
कार कर्जावर किती व्याज आकारले जाते?
कारवर कर्ज घेत असताना प्रत्येक फायनान्स संस्थेकडून वेगवेगळे व्याज आकारले जाते. त्यामुळे तुम्हाला कमी दराने व्याज आकारणारी फायनान्स संस्था निवडावी लागेल. कार कर्जावर 10.30 टक्के ते 15.25 व्याजदर आकारले जाऊ शकते.
कारचे कर्ज किती वर्षांसाठी घेतले जाते?
जर तुम्ही कार कर्ज घेत असाल तर तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की ते किती वर्षांमध्ये फेडता येऊ शकते? कार कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला तर ८ वर्षांच्या आतमध्ये फेडावे लागेल. कर्ज फेडण्यासाठी दरमहा EMI ठरून दिला जातो त्यानुसार परतफेड करावी लागते.