7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड! कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार इतकी वाढ, सरकारने केली घोषणा

Published on -

7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची होळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. कारण केंद्र सरकारकडून होळीदिवशी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाणार आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मोठा फायदा होणार आहे.

कर्मचारी संघटनांना सरकारकडून 4% DA/DR वाढीची अपेक्षा आहे. जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होईल. मागील वेळेस केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती.

केंद्र सरकारकडून नवीन वर्षातील कर्मचाऱ्यांची DA वाढ अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आता होळीदिवशी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाली तर ती १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून २ वेळा वाढ केली जाते. मात्र यंदा अद्यापही एकदाही वाढ करण्यात आलेली नाही. जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

पीटीआयशी बोलताना, ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा म्हणाले, “डिसेंबर 2022 साठी सीपीआय-आयडब्ल्यू 31 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झाला. महागाई भत्त्यात ४.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे डीए चार टक्क्यांनी वाढून ४२ टक्के होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात कर्मचारी संघटनांना डिसेंबर 2022 साठी जारी केलेला CPI-IW 132.3 होता. त्यानुसार, महागाई भत्त्यात चार टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे.

DA/DR मध्ये वाढ होण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा देखील तीव्र झाली आहे कारण मोदी सरकार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू जाहीर करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News