Best Geyser : सध्या भारतात थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकांना अंघोळीसाठी पाणी गरम करण्यास अडथळे येत आहेत. तुम्ही गिझर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त गिझर उपलब्ध झाले आहेत.
थंडीच्या दिवसांत अनेकांना अंघोळीसाठी गरम पाणी लागते. मात्र या दिवसांत जास्त गरम पाणी होत नाही. बाजारात असे काही गिझर उपलब्ध आहेत त्यातून तुम्हाला कडक आणि वाफ निघणार एकदम गरम पाणी मिळू शकते.
Polycab Emerald चे गिझर बसवून तुम्ही सकाळ सकाळी एकदम कडक पाणी अंघोळीसाठी तापवू शकता तेही फक्त काही मिनिटांमध्ये. या गीझरची खासियत अशी आहे की त्यातून तुम्हाला काही मिनिटांमध्येच गरम पाणी मिळू शकते.
गिझरची खासियत
या गिझरमधून फक्त २ मिनिटामध्ये पाणी तापवता येऊ शकते. तसेच एक वेळी एक व्यक्तीची अंघोळ होऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीला अंघोळीसाठी २ मिनिटे वाट पाहावी लागेल. या गिझरपासून कोट्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकत नाही.
हा गिझर शॉक आणि फायर प्रूफ आहे. त्यामुळे कोणत्याच युक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत नाही. हा गिझर ISI प्रमाणित आहे. त्याची किंमत 5,700 रुपये आहे. सर्वोत्तम काम करणाऱ्या गिझरपैकी हा एक गिझर आहे.
कमी किमतीत मोठा गिझर
कमी किमतीमध्ये जास्त पाणी तापवण्याची क्षमता असलेला गिझरही तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल. Zunpulse Darius असे या गिझरचे नाव आहे. 25 लिटर क्षमतेच्या या गीझरला थर्मल कट-आउट आणि शॉक प्रूफसह 6 लेयर सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
या गिझरचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे ऑपरेटिंग स्मार्टफोन वरूनही करता येऊ शकते. स्मार्टफोनमधील एका अपवरून त्याचे अॅपवरून त्याला चालू बंद करता येऊ शकते. या गिझरची किंमत किंमत 9,999 रुपये आहे.
क्रॉम्प्टन रॅपिड जेट गिझर
हा गिझर कमी लोकांसाठी खूप फायदेशीर आणि स्वस्त गिझर आहे. या गिझरची पाणी तापण्याची क्षमता ३ लिटर आहे. कमी वेळेत पाणी गिझर फायदेशीर आहे. याची किंमत 2,690 रुपये आहे.