Cheapest Bike : स्वस्तात जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक! या आहेत 70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त बाईक, देतात 72 किमी मायलेज

Cheapest Bike : देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. जर तुम्ही वाढत्या महागाईत नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक आहेत.

पेट्रोलच्या किमती अधिक वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमी मायलेज देणाऱ्या बाईक परवडत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी स्वस्तात जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक सादर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे.

आज तुम्हाला ३ जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत ७० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या बाईक ७२ किमी पेक्षा जास्त मायलेज देतात.

70 हजारांखालील टॉप 3 बेस्ट बाइक

बजाज प्लॅटिना 100

बजाज कंपनीच्या अनेक बाईक ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक म्हणून बजाजच्या बाईक्सला ओळखले जाते. प्लॅटिना बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही बाईक सर्वोत्तम फीचरसह कंपनीकडून सादर करण्यात आली आहे.

यामध्ये कंपनीने 102cc सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे सिंगल सिलिंडर इंजिन 7.9bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 72 किलोमीटरपर्यंत सहज धावू शकते.या बाईकची एक्स-शोरूम कमीत 65,856 रुपये पासून सुरू होते.

हिरो एचएफ डिलक्स

हिरो कंपनीच्या बाईक आणि स्कूटर सध्या सर्वाधिक विकल्या जात आहेत. हिरो कंपनीच्या बाईकची किंमत कमी आणि उत्तम फीचर्स असल्याने ग्राहक आकर्षित होत असतात. हिरो एचएफ डिलक्स या बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२०१३ मध्ये हिरो कंपनीकडून ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये 97.2cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 7.91bhp पॉवर जनरेट करते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 59,990 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक ६५ किमीचे मायलेज देते.

टीव्हीएस स्पोर्ट्स

टीव्हीएस स्पोर्ट्स ही बाईक अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. या बाईकमध्ये 109.7cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. हा बाईक ७० किमी पर्यंतचे मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64,050 रुपयांपासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe