Cheapest Smartphones : तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि तुमचे बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण आता भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे स्वस्तातील 5G स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करू शकता.
भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनची किंमत खूपच आहे. त्यामुळे अनेकांना हे महागडे स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होत नाही. तुम्हीही तुमच्या बजेटमधील स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
कारण आता अनेक कंपन्यांनी 4G सपोर्ट किंवा 5G सपोर्ट असणारे स्वस्तातील स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर केले आहेत. तुम्हीही १५ हजारापेक्षा कमी किमतीत ब्रँडेड 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F14 5G
सॅमसंग कंपनीने देखील आता 5G सपोर्ट असणारे अनेक स्मार्टफोन भारतामध्ये सादर केले आहेत. जर तुम्हीही या कंपनीचा बजेटमधील स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी Samsung Galaxy F14 5G हा फोन सर्वोत्तम आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 15,990 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.
समोर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच बॅटरी देखील जबरदस्त देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 25W चार्जिंग सपोर्टसह येते. ४
Realme C55
Realme C55 हा स्मार्टफोन देखील तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये तुम्हाला धमाकेदार फीचर्स असणारा स्मार्टफोन मिळत आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Lava Blaze 2 5G
तुम्हालाही १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी Lava Blaze 2 5G स्मार्टफोन उत्तम आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 128 GB स्टोरेज देण्यात येत आहे.