IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात हवामान बदल पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. तर अनेक भागातील तापमानात वाढ झाली आहे. मात्र आता भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
डोंगराळ भागात अजूनही बर्फवृष्टी सुरु आहे. तसेच काही राज्यांमध्ये पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा हवामान बदल होऊ वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD हवामान अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेगाने) पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच गहू, ज्वारी, हरभरा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान खात्यावर महाराष्ट्र, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छ आणि कर्नाटक किनारपट्टीवरील कोकणातील एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तसेच, गोवा, सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ आणि किनारी कर्नाटकातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ३७-३९ अंश सेल्सिअसच्या श्रेणीत आहे.
अगोदरही पडला अवकाळी पाऊस
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेशचे कोकण आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालं आहे. तसेच आता पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.