Pakistan Terrorist Murder : दिलासादायक, भारताच्या ‘या’ शत्रूंचा नायनाट, वाचा सविस्तर..

Ahmednagarlive24 office
Published:

Pakistan Terrorist Murder : भारतासाठी एक दिलासादायक बातमी असून, भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमधून हे समोर आले आहे. दरम्यान, यावर्षी यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले असून, जाणून घ्या यामध्ये कोना कोणाचा आहे समावेश.

दरम्यान, माहिती नुसार पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर आठवडाभरातील ही दुसरी हत्या असून, यामध्ये मोस्ट वॉन्टेड मारला गेला आहे.

यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले. लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, याचा अल बद्र या दहशतवादी संघटनांशी संबंध होता. तर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. त्यासाठी ते दहशतवादी अड्डे चालवत असत.

विशेष म्हणजे सर्व दहशतवादी अज्ञात मारेकऱ्यांच्या हातून मारले गेले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला काहीच सुगावा लागला नाही. दहशतवाद्यांमध्ये काही मुंबईचे सुद्धा गुन्हेगार होते.

05 नोव्हेंबर रोजी लष्कर कमांडर ख्वाजा शाहिदचे पीओकेमधील त्याच्या घरातून अज्ञातांनी अपहरण केले. यंत्र नंतर पीओकेमधील बॉर्डर जवळ त्याचे कापलेले डोके सापडले. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या छावणीवर झालेल्या सुंजवान दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक शाहिद होता.

10 ऑक्टोबर ला 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या फिदायन पथकाचा मुख्य ऑपरेटर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहिद लतीफ याची पाकिस्तानातील सियालकोट येथील मशिदीत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

यासोबतच 01 ऑक्टोबर रोजी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मुफ्ती कैसर फारूख याची गुलशन-ए-ओमर मदरशात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

यंत्र 09 सप्टेंबर रोजी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर रियाझ अहमद याला पीओकेच्या रावळकोटमधील अल कुद्दूस मशिदीबाहेर ठार करण्यात आले. तो पीओकेमध्ये लष्कराच्या भरतीचे काम हाताळत होता.

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मौलाना झियाउर रहमान याची कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागात 29 सप्टेंबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या या सर्व दहशतवाद्यांचा नायनाट झाल्याने भारतासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe