Mudra Loan : मस्तच! स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मुद्रा योजनेतून मिळणार 10 लाखांचे कर्ज, घरबसल्या असा करा अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

Mudra Loan : मोदी सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच अनेकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देखील दिले जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडून २०१५ मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेतून सरकार बिगर-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. MUDRA म्हणजे मायक्रो-युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी. मुद्रा योजनेचे कर्ज व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), लघु वित्त बँका, सूक्ष्म वित्त संस्था (MFIs) आणि नॉन-बँकिंग वित्त कंपन्या यांच्याद्वारे दिले जाते.

अर्ज कसा करावा

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या कोणत्याही बँक शाखेस भेट देऊ शकता. या बँकेमध्ये जाऊन तुम्ही मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता. तसेच घरबसल्याही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने udyamimitra.in वेबसाइट वर जाऊन अर्ज करून शकता.

पात्रता

मुद्रा कर्ज योजनेसाठी सरकारकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना व्यवसाय करायचा आहे असेच नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र

प्रमाणपत्र

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक (जातीमध्ये येत असल्यास) प्रवर्गाचा पुरावा

अर्जदाराचा फोटो २ प्रती (६ महिन्यांपेक्षा जुना नाही)

मशिनरी किंवा खरेदी करायच्या इतर वस्तूंचे कोटेशन

या कागदपत्रांसोबत, अर्जदाराला यंत्रसामग्री पुरवठादाराचे नाव, यंत्रांचे वर्णन आणि त्याची किंमत देखील सादर करावी लागेल.

व्यवसायासाठी, अर्जदाराने सर्व आवश्यक परवाने/नोंदणी/प्रमाणपत्रे इत्यादीसह व्यवसायाची ओळख/पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

तसेच, MUDRA कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही आणि कर्जासाठी कोणतेही तारण नाही. तसेच घेतलेले कर्ज ५ वर्षात फेडता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe