Free DTH TV Channels : आजकाल अनेकजण सतत टीव्ही रिचार्ज करून वैतागले आहेत. तसेच काही जण सतत टीव्ही रिचार्ज करावे लागत असल्याने ते DTH बंद देखील करत आहेत. तर काही जण रिचार्ज करावा लागेल या कारणाने DTH बसवतच नाहीत.
पण आर तुम्हाला मोफत DTH चॅनेल पाहायला मिळत असतील तर DTH बसवायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला मोफत DTH चॅनेल पाहता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काही काम करावे लागेल.
डीटीएच टीव्ही चॅनल विनामूल्य कसे पहावे
जर तुम्हाला मोफत DTH टीव्ही चॅनेल पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला जिओ टीव्ही ॲप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचे आवडते टीव्ही चॅनेल देखील निवडण्याची मुभा मिळते. तसेच ते मोफत पाहता देखील येते.
फ्री डीटीएच चॅनल पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Jio TV ॲप डाउनलोड करावे लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे Jio सिम असणे आवश्यक आहे, तरच ही पद्धत काम करेल अन्यथा तुम्ही याचा फायदा घेऊ शकणार नाही.
ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ॲपवर जावे लागेल आणि टीव्ही चॅनेलची यादी तुमच्या समोर येईल. मग त्यातून तुमचे आवडते चॅनेल निवडा. जिओ टीव्ही व्यतिरिक्त, जिओ सिनेमा एक असे ॲप आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्व टीव्ही चॅनेल पाहू शकता आणि संगीत देखील विनामूल्य ऐकू शकता.
जिओ टीव्ही ॲपमुळे जिओ ग्राहकांना मोफत टीव्ही चॅनेल पाहण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी काही वेगळे पैसे मोजण्याची गरज नाही. कारण जिओ टेलिकॉम कंपनीकडून रिचार्ज प्लॅनमध्ये सर्व ग्राहकांना मोफत जिओ टीव्ही वापरण्याची सुविधा दिली आहे.