Traffic Rules : मस्तच! आता वाहतूक पोलीस थांबवू शकणार नाहीत तुमची गाडी, महाराष्ट्र सरकारकडून नवीन नियम जारी

Ahmednagarlive24 office
Published:

Traffic Rules : गाडी चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. अनेकदा तुम्ही रस्त्याने प्रवास करताना वाहतूक पोलिसांनी तुमची गाडी अडवली असेल. मात्र आता वाहतूक पोलिसांना गाडी अडवता येणार नाही.

महाराष्ट्र सरकारकडून आता वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना नवीन नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक महत्वाची आहे.

अनेकदा तुम्ही पहिले असेल की रस्त्याच्या कडेला थांबलेले वाहतूक पोलीस गाड्या अडवत असतात तसेच त्यांच्या कडेला अडवलेल्या गाड्यांचा मोठा गराडा असतो. यावेळी ज्यांच्याकडे काही कमतरता असेल तर पोलीस दंड करत असतात.

मात्र आता वाहतूक पोलीस तुम्हाला आडवून देऊ शकणार नाहीत. तसेच वाहन परवाना तपासणी वाहतूक पोलिसांकडे राहणार नाही. याबाबतचा आदेश सरकारकडून जारी करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी याबाबतचे परिपत्रक वाहतूक विभागाला जारी केले आहे.

परिपत्रकानुसार वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषत: जिथे चेकनाका आहे, तिथे फक्त वाहतुकीवर लक्ष ठेवता येते. तसेच, वाहतूक सुरळीत चालू आहे की नाही यावर लक्ष केंद्रित करा असे सांगण्यात आले आहे.

वाहतुकीच्या वेगावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नसतानाच वाहतूक पोलिस वाहन थांबवू शकतील. वास्तविक, अनेकवेळा वाहतूक पोलिस संशयाच्या आधारे वाहने कोठेही थांबवून गाडीच्या आत तपासणी सुरू करतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो.

परिपत्रकात काय म्हटले आहे

वाहतूक पोलिसांना जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात वाहनांची तपासणी थांबवण्यास सांगण्यात आले आहे, याचे कारण रस्त्यांवरील वाहतूक सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिस त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार शुल्क आकारू शकतात, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीदरम्यान वाहतूक पोलिस केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू शकतील. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षक जबाबदार राहतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe