Driving Licence : देशात कुठेही वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. वाहन चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्याकडून दंड आकाराला जातो. तसेच विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे गुन्हा मानला जातो.
तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुमच्याकडे लायसन्स नसेल तर पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. मात्र आता वाहन चालवताना लायसन्सची गरज नाही. लायसन्स नसतानाही तुम्ही गाडी चालवू शकता.
तुमच्या डोक्यात प्रश्न यापडला असेल की हे कसं शक्य आहे? हा तर हे शक्य आहे. विना ड्रायव्हिंग लायसन्स चे तुम्ही कार किंवा स्कूटर चालवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स घरी असले तरीही काही टेन्शन नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसले तरीही आता पोलीस तुमच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. मात्र त्याआधी तुम्हाला सरकारने डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजीलॉकर नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे.
हे अॅप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सुरु ठेवावे लागेल. त्यामध्ये तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स ची एक प्रत अपलोड करावी लागेल. ही प्रत वैध मानली जाते. जेव्हा तुम्हाला लायसन्स ची गरज पडेल तेव्हा तुम्ही ही प्रत दाखवू शकता.
जर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे ठेवायचा नसेल, तर तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी डिजीलॉकरमध्ये अपलोड करू शकता आणि ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत घरी आरामात ठेवू शकता.
यानंतर, जर तुम्ही कार, बाईक किंवा स्कूटर वगैरे चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसाने तुम्हाला थांबवले तर तुम्ही त्यांना डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेल्या परवान्याची सॉफ्ट कॉपी दाखवू शकता. त्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.