कोरोनानंतर पुन्हा एकदा जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेत पसरलेल्या एका रहस्यमय साथीच्या आजारामुळे १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या आजाराचा अद्याप उलगडा न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे,
या आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, उपचाराअभावी बहुतांश रुग्णांचा घरातच मृत्यू होत आहे. या आजाराचा सर्वाधिक परिणाम महिला आणि मुलांवर दिसून आला आहे.
संशोधकांच्या मते, आफ्रिका आणि आशियातील वाट लोकसंख्या असलेल्या भागांत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. अशा स्थितीत हा रोग झपाट्याने पसरला तर संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. हा आजार अद्याप भारतात पोहोचला नसला तरी त्याची वाढती प्रकरणे पाहता सावध राहणे गरजेचे आहे.