Cow Hug Day : सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून यामध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जातात. असे असताना केंद्र सरकारने व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी ऐवजी गायीला मिठी मारा पशू कल्याण बोर्डाने हा निर्णय घेतला. यामुळे यावर अनेकांनी टीका केली. हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आदेशही काढले होते.
यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले, मी पण शेतकरी कुटुंबातील आहे, गाईला आपण गोंजारले आहे पण गाईला मिठी कधी मारली नाही. दिल्लीत बसतात आणि काहीतरी आदेश काढतात.
काय हग डे, त्यांना म्हणाव ये एकदा काऊ समोर मग निघेल काऊ हग डे एक लाथ मारली की इकडे-तिकडे जाईल फरफटत, असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दरम्यान, या निर्णयावर अनेकांनी टीका केल्याने केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. यावर अनेकांनी टीका केली. यामुळे आदेश मागे घेण्यात आला आहे.
या आदेशाविरोधात मीम्सचा पूर सोशल मीडियावर आला होता. यामध्ये गाईला 14 फेब्रुवारी रोजी मिठी मारावी, असा आदेश सरकारने काढला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर टीकेचे सूर उमटू लागले होते. त्यानंतर आज सरकारकडून पत्रक काढत आदेश मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली. यावर अनेक फोटो व्हायरल झाले होते.
व्हेलेंटाइन डे ऐवजी Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. यामुळे सरकारवर टीका केली जात होती.
भारतीय पशू कल्याण मंडळाने गाईला मिठी मारण्याचा आदेश पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला. सोशल मीडियावर अनेकांनी याच्या व्हिडिओ आणि फोटो देखील तयार केले होते. यामुळे हा निर्णय मागे घेतला गेला आहे.