Credit Card Rules : तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने मोठा निणर्य घेत क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि आता SBI ने क्रेडिट कार्ड भाडे भरणा शुल्काबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत.
ज्याची माहिती बँकेने सर्व ग्राहकांना ईमेलद्वारे दिली आहे. त्यानुसार प्रक्रिया शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. याआधी युजर्सना 99 रुपये द्यावे लागायचे, आता 199 रुपये द्यावे लागतील. नवीन शुल्क 17 मार्च 2023 पासून लागू होईल. प्रोसेसिंग फीसोबतच ग्राहकांना जीएसटीही भरावा लागेल.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाड्याच्या पेमेंटवर 99 रुपये शुल्कासह 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. आता वापरकर्त्यांना 199 रुपये + GST भरावा लागेल. याशिवाय व्यापारी ईएमआयच्या व्यवहारावरही शुल्क वाढवण्यात आले आहे. जे 99 रुपयांवरून 199 रुपये करण्यात आले आहे. SBI व्यतिरिक्त अनेक बँकांकडून प्रक्रिया शुल्क देखील भरले जाते.
या यादीत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँक यांचाही समावेश आहे. HDFC भाड्याच्या देयकांसाठी 1% प्रक्रिया शुल्क आणि कर आकारते. बँक ऑफ बडोदा भाड्याच्या पेमेंटवर 1% आकारते. त्याच वेळी, ICICI बँक 1% प्रक्रिया शुल्क देखील आकारते.
हे पण वाचा :- Today IMD Alert : हवामान विभागाचा अंदाज ! यावर्षी राज्यात उन्हाळा मोडणार 12 वर्षांचा विक्रम; जाणून घ्या ताजे अपडेट्स