Steel and Cement Price : घर बांधायचा विचार करत असाल तर आताच घर बांधण्यासाठी सुवर्णसंधी मानली जात आहे. कारण स्टील आणि सिमेंटचे दर सध्या सामान्य स्थितीवर आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना खूप पैसे वाचू शकतात.
घर बांधण्यासाठी हीच वेळ आहे. कारण सध्या स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दर कमी आहेत. मात्र उन्हाळ्यामध्ये स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होते त्यामुळे दर देखील वाढतात.
स्टील आणि सिमेंट घर बांधण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीमध्ये स्टील आणि सिमेंट खरेदी केले तर तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये स्वप्नातील घर बांधू शकता.
प्रत्येकजण घर बांधण्यासाठी आयुष्यभरात कमावलेले पैसे घालवत असतो. मात्र काहींचे बजेट कमी असल्याने स्टील आणि सिमेंटच्या वाढत्या दरात घर बांधणे शक्य होत नाही. मात्र आता तुम्ही स्टील आणि सिमेंट कमी दरात खरेदी करू शकता.
स्टील आणि सिमेंटचे नवीन दर
सध्या देशात स्टील आणि सिमेंटच्या किमतीत समानता दिसून येत आहे, सध्या दोन्ही वस्तूंचे दर सामान्य स्थितीवर चालू आहेत, परंतु वीट आणि वाळूच्या किमतीत फारसा फरक नाही.
देशात सध्या सिमेंटचे दर प्रति बॅग 340 ते 400 रुपयांपर्यंत सुरु आहे. तसेच विटांची किंमत 6 हजार ते 7000 रुपयांपर्यंत आहे. स्टीलची किंमत सुमारे 65000 रुपये प्रति टन आहे.
स्टील आणि सिमेंटच्या किमतीत सतत बदल होतात
स्टील आणि सिमेंटचे दर सध्या सामान्य पातळीवर आहेत. तसेच यांचे दर सतत बदलत असतात. स्टील आणि सिमेंटच्या मागणीनुसार त्यांचे दर ठरत असतात. तसेच सध्या मागणी कमी असल्याने दर घसरत आहेत.