पंतप्रधानांच्या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग

Ahmednagarlive24 office
Published:

India News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्व उपक्रम व प्रकल्पात देशाच्या नागरिकांचा थेट सहभग करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण भारतात माझी माती माझा देश हे अभियान राबवले जात आहे.

या अभियानामध्ये देशातील प्रत्येक भागातून नागरिक उत्स्फूर्तपणे अमृत कलशात माती जमा करत आहेत. दिल्लीत जमा होणाऱ्या मातीमधून राष्ट्रपती भवनात एक मोठे उद्यान विकसित होणार आहे.

नगर शहरातही माझी माती माझा देश हे अभियान सर्वत्र उत्स्फूर्तपणे राबवले जात असल्याचे प्रतिपादन नगर शहर भाजपाचे विधानसभा प्रमुख महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.

नगर शहर भाजपच्या नेत्या रेखा विधाते यांच्या प्रयत्नातून आगारकर मळा येथे माझी माती माझा देश अभियाना राबवण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो महिला व नागरिकांनी आणलेली माती अमृत कलशात जमा केली.

यावेळी भैय्या गंधे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी नगरसेवक किशोर बोरा, संतोष गांधी,

सुमित बटोळे, व्यंकटेश बोमादंडी, सिद्धेश नाकाडे, अॅड. श्रीकांत ताके, विजय गायकवाड, सौरभ भांड, मल्हार गंधे, ओम काळे, चंद्रकांत पाटोळे, अॅड.ऋग्वेद गंधे, उमेश बोरा आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe