Shanivaar Remedies : शनिदेवासाठी आज करा हे 5 उपाय, लग्न, नोकरी यासारख्या समस्या झटक्यात होतील दूर…

Published on -

Shanivaar Remedies : तुम्ही ग्रहांची शांती किंवा ग्रहदोष असे शब्द ऐकले असतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष असेल तर त्याची शांती करावी लागते. तसेच शनिवारी शनिदेवाची किंवा हनुमानजींची पूजा केली जाते. अनेकजण शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात असतात.

ग्रह अनेकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे हे सातत्याने सुरूच असते. शनिदेवाला अधिक महत्व आहे. शनिदेवाला कर्माचा दाता म्हंटले जाते. शनिदेव नेहमी कर्मानुसार फळे देत असतात.

शनिदेव अनेकदा प्रसन्न व्हावेत यासाठी अनेकजण त्यांची दर शनिवारी पूजा करत असतात. मात्र जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला काही उपाय करावे लागतील. हे उपाय करताच तुमच्या जीवनात असलेली नोकरी आणि लग्नाची समस्या सुटेल.

शनिवारी हे पाच उपाय नक्की करा

शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात साखर टाकून पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करा. ओम ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या घरात सुख-शांती नांदेल आणि तुमच्या जीवनात ज्या समस्या असतील त्या दूर होतील.

शनिवारी वाहत्या पाण्यात कोळसा वाहावा. यासह शं शनिश्चराय नमः चा जप करा. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि नोकरीत यश मिळेल. तसेच शनिदेवाची तुमच्यावर खुश होतील.

जर तुमच्या आयुष्यात कोर्ट कचेरी सारख्या समस्या असतील तर विकृत न झालेल्या पीपळाची 11 पाने घ्या. त्यापासून एक हार बनवा, आणि ही हार केलेली माळ शनिदेवाला अर्पण करा. त्यावेळी ओम श्री शं शनैश्चराय नमः चा जप करा.

अनेकांना वैवाहिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. मात्र शनिदेवाचा हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करावेत. यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.

जीवनात प्रगती हवी असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या सुती धाग्याला सात वेळा गुंडाळा. या दरम्यान शनिदेवाचे ध्यान करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News