Monday Remedies : आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते. तसेच प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावर निष्ठा असते. आज सोमवार आहे. हा दिवस शंकराला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते.
महादेवाची पूजा करण्यासाठी अनेकजण ज्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन पूजा पाठ करत असतात. ज्योषशास्त्रानुसार पूजा केल्याने तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल आणि तुमच्या मनातील नोकरी तुम्हाला मिळून जाईल.
भगवान शंकराची विधी पूर्वक पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यशदेखील मिळेल. त्यामुळे सोमवारी पूजापाठ करणे खूप महत्वाचे मानले जाते.
अनेकजण सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील ठेवतात. स्त्रिया आणि पुरुष दोघेही सोमवारी व्रत करू शकतात. त्यामुळे भगवान शंकर खुश होऊन आशीर्वाद देखील देतात असे ज्योषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
नोकरी मिळवण्यासाठी
तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सोमवार हा भाग्यदायक ठरू शकतो. सोमवारी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.
सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. दूध अर्पण करताना त्यात काही गोड आणि तांदळाचे दाणे मिसळावे यामुळे तुम्हाला यश मिळेलच आणि भगवान शंकर देखील खुश होतील.
शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करा
सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, बेलपत्र, धतुरा अर्पण करा. तसेच जे शमी पात्र असते ते अर्पण केल्यानंतर भगवान शंकर खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. शमीपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे.
कृपया माता पार्वती
ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी भगवान शिव तसेच माता पार्वतीला प्रसन्न करण्याचा नियम आहे. असे म्हटले जाते की माता पार्वती स्त्रियांना अखंड सौभाग्य देते. म्हणूनच विवाहित स्त्रिया त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारी उपवास करतात. आणि इच्छित वरासाठी प्रार्थना करतो.