Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रात अनेक वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. तसेच चंद्राची पूजा करणे शुभ मानले जाते. कुंडलीमधील दोष दूर करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच चंद्राला पांढरा रंग खूप आवडतो.
पौर्णिमा असल्या दिवशी चंद्र हा स्पष्ट आणि पांढरा शुभ्र दिसत असतो. यावेळी सर्वजण चंद्राला नमस्कार करतात तर काही पूजाही करतात. भगवान शंकराच्या डोक्यावरही चंद्राची अर्धी कोर पाहायला मिळते.
ज्योतिषशास्त्रात कच्च्या दुधाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. असे केल्याने लवकरच तुम्ही धनवान बनलं असे सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया काय आहेत उपाय…
कच्च्या दुधाचे उपाय खालीलप्रमाणे
कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर करण्यासाठी
ग्रह डोळस दूर करण्यासाठी अनेकदा चंद्राची पूजा केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष खूप प्रबळ होत असतील किंवा राहू, शनी, केतू या ग्रहांमुळे त्रास होत असेल तर दुधाचा वापर करावा. यासाठी सोमवारपासून पुढील ४१ दिवस दररोज भगवान शंकराला कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे सर्व ग्रहांचे दोष दूर होतील आणि ते चांगले परिणाम देऊ लागतील.
घरात शांतता आणि प्रसन्न वातावरण मिळावे
घरातील त्रास दूर करण्यासाठीही दूध हा एक चांगला उपाय आहे. या उपायामध्ये तुम्हाला रोज साखर मिसळलेले कच्चे दूध तुमच्या आवडत्या देवतेला अर्पण करावे लागेल.
देवतेसमोर उभे राहून थोडावेळ घरात शांतता राहावी यासाठी प्रार्थना करा. तसेच सांगितलेला उपाय करू पहा नक्कीच तुम्हाला घरामध्ये शांतता पाहायला मिळेल.
चिंता सोडवण्यासाठी
सोमवारी दुधात तांदूळ मिसळून खीर बनवा. ही खीर भगवान शिवाला अर्पण करा आणि संपूर्ण खीर गरीब मुलांना किंवा भिकाऱ्यांमध्ये वाटून टाका. असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या चिंतांपासून त्वरित आराम मिळेल. जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडले तर ते देखील पडणार नाहीत.
आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी
पैसे कमवण्यासाठी अनेकजण कष्ट करत असतात. मात्र अनेकांच्या घरामध्ये पैसे टिकत नाही. त्यामुळे तुम्ही रविवारी रात्री एक ग्लास दूध डोक्याजवळ ठेवा आणि झोपा. दुसऱ्या दिवशी कोणालाही काहीही न बोलता हे दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाशी टाकावे. हे सात रविवार सतत करावे लागते. हा उपाय सुरू करताच पैसे मिळू लागतील.