Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रानुसार अनेकजण आजही काही घरगुती उपाय करत असतात. रविवारी काही उपाय केल्याने कुबेर देव प्रसन्न होऊन तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडतील. जर तुमच्याकडेही पैसे टिकत नसतील तर काही उपाय करून पहा तुमचीही तिजोरी पैशाने गच्च भरेल.
सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. नियमित स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास विशेष पँट होते असे वास्तुशास्त्रात म्हंटले आहे.
रविवारच्या दिवशी तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे. तसेच मंदिरात ‘ओम नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.
गायत्री मंत्राचा जप केल्याने घरात शुभ वातावरण तयार होते. सूर्य गायत्री मंत्र ‘ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयताः’ या मंत्राचा दररोज सकाळी १०८ वेळा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
जर रविवारी तुम्हाला सुर्यदेवाला प्रसन्न करायचे असेल तर खिशात भगव्या रंगाचा रुमाल ठेवा. भगव्या रंगाचा रुमाल रोज वारपणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला धनप्राप्ती होईल.
रोज सकाळी आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याने करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होते. यासोबतच भरपूर धनलाभ होतो आणि आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते.