Earthquake : मोठी बातमी! दिल्ली भूकंपाने हादरली, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagarlive24 office
Published:

Earthquake : दिल्लीमधून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे लोकं घराबाहेर पडले आहेत. किमान दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नेमकं काय होत आहे हे लवकर समजले नाही.

सुमारे १० सेकंद जमीन हादरत राहिली. त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भूकंपाची अचूक तीव्रता अद्याप स्पष्ट नाही. पण सहा रिश्टर स्केल पेक्षा जास्त रिश्टर स्केलची तीव्रता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नागरीक प्रचंड भयभीत झाले आहेत. भूकंपाते तीव्र धक्के भारतासह, तजाकिस्तान आणि चीनमध्ये सु्द्धा जाणवल्याची माहिती मिळत आहे.

तसेच भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले आहेत. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. येथेही लोक घराबाहेर पळाले. अफगाणिस्तानचे हिंदुकुश हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की, लोक घराबाहेर पडले. श्रीनगरमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक घराबाहेर उभे आहेत. यामुळे आता लोकांची झोप उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe