सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, पहाटे 5.36 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केलवर मोजली गेली.भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतील नांगलोई येथे होता.
अधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे निर्देश

अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, “सतर्क राहा आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करा.”
दिल्लीतील नागरिक घाबरले
भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक भागात लोक घाबरून घराबाहेर पडले. काही ठिकाणी घरांमधून भांडी पडण्यास सुरुवात झाली आणि भिंतींमध्ये कंप जाणवला. सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जिथे इमारती आणि वस्तू हलताना दिसत आहेत.
USGS नेही भूकंपाची पुष्टी केली
अमेरिकन भूकंप संशोधन संस्था USGS नेही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्याची नोंद केली आहे. त्यांच्या अहवालानुसार, 280 हून अधिक लोकांनी हा भूकंप अनुभवला.
भूकंप का जाणवला जास्त तीव्र ?
भूकंपाचा केंद्रबिंदू नांगलोई, दिल्लीमध्ये असल्याने त्याचा प्रभाव शहरभर मोठ्या प्रमाणात जाणवला.भूकंपाची खोली कमी (सुमारे 5 किमी) असल्याने हादरे जास्त तीव्र वाटले.दिल्ली भूकंपीय क्षेत्र IV मध्ये येते, जिथे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो.
सतर्क राहण्याचे उपाय
भूकंपाच्या वेळी मजबूत टेबल किंवा बेडच्या खाली आसरा घ्या, खिडक्या, दरवाजे आणि काचांच्या वस्तूंपासून दूर राहा, लिफ्टचा वापर टाळा आणि सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग शोधा, सरकारी निर्देशांचे पालन करा आणि आपत्कालीन सेवा क्रमांक जवळ ठेवा.