Earthquakes Turkey Syria : भूकंपाचा तुर्कस्तान, सीरियामध्ये हाहाकार, आता मृत्यूचा आकडा २१ हजारांवर

Earthquakes Turkey Syria : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंप होऊन जवळपास पाच दिवस झाले आहेत, मात्र अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शहरामागून एक शहर उद्ध्वस्त झाले आहे आणि सर्व काही नाहीसे झाले आहे, असे असूनही, लोकांना आशा आहे की त्यांची मानस ढिगाऱ्याखाली अडकले असेल आणि ती जिवंत असतील.

सध्या दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा २१ हजारांच्या पुढे गेला असून हा आकडा अजून वाढू शकतो. हजारो लोक रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियामध्येही बचाव आणि मदतकार्य तीव्र करण्यात आले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही देशांतील विनाशकारी भूकंपाने तीन प्राचीन शहरे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत.

भूकंपात जुनी शहर पूर्ण उध्वस्त झाली आहेत. ही शहरे अंताक्या, सानलिउर्फा आणि अलेप्पो आहेत, जी भूकंपग्रस्त शहरांपैकी सर्वात जास्त आहेत. दक्षिण मध्य तुर्कीतील अंताक्या शहराची लोकसंख्या सुमारे 2.50 लाख होती. या शहराचा मोठा भाग कोसळला आहे. तसेच पूर्वेकडील सॅनलिउर्फाचीही अशीच स्थिती आहे. हे शहर सीरियन संस्कृतीचे प्रमुख केंद्र मानले जात असे.

भूकंपग्रस्त सीरिया आणि तुर्कस्तानला मदत करण्यासाठी अमेरिकेने 85 दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत जाहीर केली आहे. मानवतावादी सहाय्यामध्ये आपत्कालीन अन्न आणि निवारा, आघात समर्थन, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि निर्वासित आणि नव्याने विस्थापित लोकांसाठी स्वच्छता समर्थन प्रदान करणे समाविष्ट आहे.

तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले आहे. या माध्यमातून भारताने तुर्कस्तानच्या लोकांना मदतीचा हात वाढवला आहे. लष्कर, हवाई दलाचे कर्मचारी, एनडीआरएफ आणि डॉक्टरांचे पथक तुर्कीला पाठवण्यात आले आहे. मदत साहित्यही मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात आले आहे.

भारतातून हवाई दलाच्या विमानातून मोठ्या प्रमाणात मदत आणि वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले आहे. संकटात सापडलेल्या सीरिया आणि तुर्कस्तानला मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe