India News : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावसे आहे. आता त्यांना २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आजारपणातून बऱ्या होऊन घरी परतातच काही दिवसांतच ईडीचे समन्स आले आहे.
त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला असून पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज दिल्लीत बैठक होणार आहे. जूनमध्येच सोनिया गांधी यांना पहिले समन्स आले होते. त्यांना ८ जून रोजी हजर राहण्यासा सांगण्यात आले होते.

मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं सोनिया गांधी यापूर्वी ईडीच्या कार्यालयात जाऊ शकल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधल्या काळात त्यांना वगळून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. आता सोनिया परतल्याने त्यांनाही समन्स पाठविण्यात आले आहे.