Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. त्यामुळे वाहन खरेदीदारांना मोठा फायदा होत आहे. कारण इंधनाच्या किमती खूप वाढल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून इंधन टाकण्याचे झंझट मिटणार आहे.
आता हैदराबाद ई-मोटर शोमध्ये नवीन इलेक्ट्रिक बाइक Hop Ox लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याने आणखी एक नवीन बाईक लॉन्च करण्यात आली आहे.
हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक
जयपूरच्या स्टार्टअप कंपनी हॉप इलेक्ट्रिकने ही नवीन हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये धम्माल फिचर आणि बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये रेंज देखील जबरदस्त देण्यात आली आहे.
बॅटरी पॉवर आणि रेंज
प्रत्येक इलेक्ट्रिक कंपनीच्या वाहनांमध्ये इतर कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा काहीतरी वेगळे फिचर देण्यात येत आहेत. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.75kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 6.2 kW ची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच ताशी ९० किमी पर्यंतचा टॉप स्पीड देण्यात आला आहे.
किंमत
कंपनीकडून या इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.70 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या बाईकवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्ही ५ हजार डाऊनपेमेंटवर ही बाईक खरेदी करू शकता. यासाठी उर्वरित रक्कम तुम्हाला फायनान्स म्हणून कर्ज दिले जाईल. ही रक्कम तुम्हाला 4,954 च्या मासिक हप्त्याने बँकेला द्यावी लागेल.
वैशिष्ट्ये
4G कनेक्टिव्हिटीसह 5.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, नेव्हिगेशन, स्पीड कंट्रोल, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट सिस्टम आणि राइड स्टेटस, कॉल एसएमएस अलर्ट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ओटीए, पार्क असिस्ट, हेल्मेट वैशिष्ट्ये जसे रिमाइंडर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, एसओएस अलर्ट समाविष्ट आहेत.