Electric Bike : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी त्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात सादर केली आहेत. तसेच अनेक कंपन्या ऑटो मार्केटमध्ये त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत.
आता स्टार्ट अप टू व्हीलर कंपनी मॅटर आपल्या शक्तिशाली इलेक्ट्रिक Aira 5000 बाईकचर बुकिंग 17 मे पासून सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील एक शक्तिशाली बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.
टू व्हीलर कंपनी मॅटर आपल्या पहिल्या 9999 बाईक खरेदीदारांना ५ हजार रुपयांची सूट देणार आहे. त्यानंतरच्या २० हजार बाईक खरेदीदारांना 2500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ही इलेक्ट्रिक बाईक खरेदीदारांच्या पैशांची देखील बचत होणार आहे.
अवघ्या 6 सेकंदात 60 किमी प्रतितास वेग
Aera 5000 या इलेक्ट्रिक बाईकमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीकडून या बाईकमध्ये 10 kW क्षमतेची शक्तिशाली बॅटरी बसवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 6 सेकंदात 60 kmph चा वेग पकडते. बाईकमध्ये 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायचं असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ती बुक करावी लागेल. तसेच फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही ही इलेक्ट्रिक बाईक बुक करू शकता.
सिंगल चार्जमध्ये 125Km पर्यंत धावते
ही इलेक्ट्रिक बाइक एका फुल चार्जमध्ये 125Km पर्यंत धावते. सध्या कंपनी विशाखापट्टणम, विजयवाडा, म्हैसूर, कोईम्बतूर, मदुराई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, जयपूर, इंदूर, पाटणा, लखनौ, कानपूर, गुवाहाटी, या ठिकाणी या बाइकसाठी प्री-बुक सुविधा सुरु करेल.
DC फास्ट चार्जरने फक्त 2 तासात पूर्ण चार्ज
Aera 5000 या इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरूम किंमत 1.44 लाख रुपये असू शकते. तसेच Aera 5000+ ही इलेक्ट्रिक बाईक 1.54 लाख रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असेल.
कंपनीकडून या बाईकची विक्री या वर्षाच्या अखेरीस सुरु केली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बाईकमध्ये इनबिल्ट अॅक्टिव्ह कुलिंग सिस्टीम, वेगवेगळे रायडिंग मोड देण्यात आले आहेत. सामान्य चार्जरने बॅटरी ५ तासांत चार्ज होते. त्याच वेळी, डीसी फास्ट चार्जर केवळ 2 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते.