Electric Car : देशात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात कारच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता ग्राहक बाईकच्या किमतीमध्ये कार खरेदी करू शकता. आता टाटा कंपनीकडून लवकरच कमी किमतीची इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे.
आता टाटा कंपनीकडून कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक नॅनो कार लॉन्च केली जाणार आहे. या नॅनो कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स असणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
टाटा कंपनीने गेल्या काही वर्षांपूर्वी नॅनो कार लॉन्च केली होती. या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. कमी किमतीमध्ये ही कार उपलब्ध असल्याने ग्राहकही चांगलेच आकर्षित झाले होते. पण आता या कारची लोकप्रियता कमी झाली आहे.
त्यामुळेच कंपनीकडून आता नॅनो कारचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. या मॉडेलची किंमत देखील खूपच कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक कार उपलब्ध होणार आहे.
जुन्या नॅनो कारमध्ये 624 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जबरदस्त टॉर्क देण्यास सक्षम होते. पण आता कंपनीकडून नवीन इलेक्ट्रिक नॅनो कार लॉन्च केली जाणार आहे.
बॅटरी आणि रेंज
टाटा कंपनीकडून इलेक्ट्रिक नॅनोमध्ये 19kwh ची बॅटरी देण्यात येणार आहे. त्यामुळे सिंगल चार्जमध्ये 250 km रेंज देण्याची क्षमता या कारमध्ये आहे. तसेच कंपनीकडून आणखी एक नॅनोचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. या मॉडेलमध्ये 24kWh बॅटरी देण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार सिंगल चार्जमध्ये 315 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण देखील कमी होत आहे आणि इंधनावरील पैसे देखील वाचत आहेत.
किमती
टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक नॅनो कारची कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण नॅनो इलेक्ट्रिक कारची किंमत खूपच कमी असेल असा दावा करण्यात येत आहे. ग्राहक बाईकच्या किमतीमध्ये इलेक्ट्रिक नॅनो कार खरेदी करू शकतात.
कंपनीकडून कारच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण २०२४ पर्यंत ही इलेक्ट्रिक नॅनो कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडे दिवस थांबू शकता.