Electric Scooter : सध्या भारतीय बाजारात अनेक कंपन्यां इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यावर अधिक भर देत आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहे. आता प्रत्येक कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे अधिक लक्ष दिले जात आहे.
प्रत्येक कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनेक पर्याय मिळत आहेत. पण सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच असल्याने अनेकांना ती खरेदी करणे परवडत नाही.

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत भर पडत आहे. त्यामुळे त्यांची किंमतही अधिक आहे. पण आता अनेक कंपन्या कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू लागल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांचे पैसे वाचत आहेत.
बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी Simple One ही देखील बाजारात 236 किमीच्या रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
Simple One या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील कमी ठेवण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर लाँग रेंज आणि हायटेक फीचर्ससह सादर केली जाणार आहे. या स्कूटरमध्ये 4.8 kW आणि 1.6 kW क्षमतेच्या दोन लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. कंपनी बॅटरीवर ३ वर्षांची वॉरंटी देणार आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8500 वॅटची इलेक्ट्रिक मोटर देखील जोडण्यात आली आहे.
कंपनीचा दावा केला जात आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 236 किलोमीटरची रेंज देते. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आणि एकदा चार्जिंग केली तर तुम्हाला 236 किलोमीटरपर्यंत काहीच अडचण नाही. ही रेंज ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आली आहे. त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत.
वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वायफाय कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलाइट, एलईडी पॅनेल सिग्नल, डिजिटल ट्रिप मीटर, स्पीडोमीटर आणि तीन रायडिंग मोड देखील समाविष्ट आहेत.













