Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये मिळणार 120 किमीची रेंज, खरेदी करा जबरदस्त वैशिष्ट्यांसह सज्ज असलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Scooter : देशात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाल्या आहेत. ग्राहकांकडून देखील इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडला जात आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीकडे लक्ष देत आहेत.

सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

आता बाजारात जबरदस्त लूक आणि दमदार वैशिष्ट्ये असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमधील आहे. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल तुम्हाला १२० किमीची रेंज देईल. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला बॅटरी काढण्याचा देखील पर्याय दिला जात आहे.

GoGoro इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होणार आहे

GoGoro ही एक तैवानची कंपनी आहे, ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवते. 2011 मध्ये या कंपनीची कंपनीची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून ही कंपनी जबरदस्त आणि मजबूत इलेक्ट्रिक स्कूटर बनवत आहे.

या कंपनीची एक इलेक्ट्रिक स्कूटर सर्वाधिक लोकप्रि आहे. गोगोरो 2 असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. सध्या या स्कूटरचे वितरण तैवानमध्ये सुरु आहे. लवकरच भारतात देखील ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे.

GoGoro इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक

GoGoro २ ही इलेक्ट्रिक स्कूटर ५ रंगामध्ये उपलब्ध आहे. पांढरा, काळा, नारंगी आणि निळा या रंगसह ही स्कूटर सध्या तैवानमध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्कूटरचा लूकदेखील जबरदस्त देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी आरामदायी आहे. तसेच या स्कूटरचे वजन देखील खूपच कमी आहे.

ही स्कूटर एका चार्जमध्ये 120 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे

गोगोरो 2 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये जवळपास १२० किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 6.4 kWh क्षमतेच्या लिथियम-आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe