Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. तसेच ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये देखील वाढ होत आहे.
त्यामुळे आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील दिवसेंदिवस अनेक कंपन्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.
ग्रीन टेकचा अनुभव असलेल्या गुजरातमधील एका भारतीय कंपनीने आता आपल्या दुचाकी वाहनांसह EV क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीकडून ओडिसी हॉक नावाची इलेक्ट्रॉनिक स्कूटी लॉन्च केली आहे.
कंपनीकडून ओडिसी हॉक नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली बॅटरी देखील देण्यात आली आहे. तसेच लूकही जबरदस्त देण्यात आला असल्याने ग्राहकांना देखील ही स्कूटर अधिक पसंत येईल असा दावा करण्यात येत आहे.
Odysse इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध सर्वोत्तम वैशिष्ट्ये
सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या असल्याने ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
Odyssey Hawk Plus इलेक्ट्रिक स्कूटर शक्तिशाली 1800-वॅट मोटर देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 170 किमी पर्यंतची रेंज देत आहे. त्यामुळे तुम्ही सिंगल चार्जमध्ये 170 किमी बिनधास्त प्रवास करू शकता.
ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्जिंग होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागत आहे. यामध्ये 2.96 kWh आयन बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये एक डिजीटल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी वेळात जास्त वेग धारण करण्याची क्षमता ठेवते.
ओडिसी इलेक्ट्रिक हॉक इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात एक्स शोरूम किंमत 99000 रुपयांपासून सुरू होते. Odyssey Electric Hawk 2 प्रकारांसह येते ज्यात Odyssey Electric Hawk Lite समाविष्ट आहे.
Odyssey Electric Hawk Plus हा टॉप व्हेरिएंट आहे ज्याची एक्स शोरूम किंमत 1,18,000 रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर EMI वर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा ३ हजार रुपये EMI भरावा लागेल.