Electricity Bill : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये विजेचा अधिक वापर होतो त्यामुळे वीजबिल जास्त येत असते. या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. मात्र आता लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे.
तुम्ही वीजबिल जास्त येत आहे म्हणून त्रस्त झाला असाल तर उन्हाळ्यामध्ये तुमचे वीजबिल निम्मे येईल अशा काही टिप्स सांगणार आहोत. त्या टिप्स वापरून तुम्ही कमी वीजबिल आणू शकता.

हिवाळ्यामध्ये तुम्ही जी उपकरणे वापरत आहेत ती उपकरणे उन्हाळ्यात वापरणे तुम्हाला पूर्णपणे बंद करावे लागेल. तेव्हाच तुमचे वीजबिल कमी होईल. जाणून घेऊया कोणती आहेत ती उपकरणे…
इलेक्ट्रिक हीटर
थंडीच्या दिवसांत पाणी तापवण्यासाठी इलेक्ट्रिक हिटरचा अधिक वापर केला जातो. तसेच हे हिटर वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात. त्यांचा आकार लहान मोठा असतो त्यामुळे युनिट जास्त पडत असतात. हे उन्हाळ्यामध्ये वापरणे बंद केल्याने वीजबिल कमी येईल.
इलेक्ट्रिक गिझर
हिवाळ्यात पाणी वारंवार गरम करण्यासाठी गीझर वापरला जातो. गीझरचा वापर जास्त वाढला तर वीज बिलात मोठी वाढ होते. जर तुमच्या घरात इन्स्टंट गीझर वापरला जात असेल तर विजेचा वापर आणखी जास्त होतो कारण तो खूप वीज घेतो आणि कमी वेळात पाणी गरम करतो. त्याचा वापर थांबवून तुम्ही वीज बिलात बरीच बचत करू शकता.
इलेक्ट्रिक ब्लोअर
इलेक्ट्रिक ब्लोअर थंडीच्या दिवसांत जास्त प्रमाणात वापरला जातो. यामुळे खोली उबदार ठेवली जाते. मात्र ब्लोअर वापरने तुमची डोकेदुखी वाढवू शकते. कारण ब्लोअर वापरल्याने तुमचे वीजबिल जास्त येऊ शकते. मात्र उन्हाळ्यात या उपकरणाचा वापर थांबवल्याने वीजबिल निम्मे येईल.