Electronic Stability Control Cars : देशात ऑटो क्षेत्रातील कंपनीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. लोक मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी देखील वाढली आहे. वाहनांची गर्दी वाढल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.
त्यामुळे आजकाल अनेकजण सेफ्टी फीचर्स असलेली कार खरेदी करण्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. अनेक कंपन्यांकडून कारमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ESC हे एक असे फीचर्स आहे ज्यामुळे कारचा अपघात होण्याचे प्रमाण देखील कमी असते. हे फीचर्स जास्त किंमत असलेल्या कारमध्ये जास्त करून पाहायला मिळते. मात्र भारतात अशा काही तीन कार आहेत ज्यांची किंमत १० लाखांपेक्षा कमी असूनही ESC हे फीचर्स पाहायला मिळते.
ESC म्हणजे काय
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ESC म्हणजे काय? ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण हे कारशी संबंधित एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला गाडी चालवताना मदत करते.
कारमधील ईएससी कॉर्नरिंग, हार्ड ब्रेकिंग किंवा कार अचानक घसरणे टाळण्यास मदत करू शकते. हे आपोआप कारच्या चाकांवर ब्रेक लावते आणि चालकाला वाहन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कोणत्या स्वस्त कारमध्ये ESC फीचर्स आहे?
रेनॉल्ट क्विड
Renault Kwid ही कार देखील एक सध्या लोकप्रिय कार बनली आहे. या कारमध्ये देखील ESC हे फीचर्स देण्यात येत आहे. हे फीचर्स 2023 च्या सुरूवातीस रेनॉल्टच्या सर्वात अलीकडील लाइनअपमध्ये सादर केले गेले आहे.
या कारमध्ये सेफ्टीसाठी अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये सेफ्टी किटमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम इतर सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या कारची किंमत 4.70 लाख ते 6.33 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
मारुती स्विफ्ट
मारुती सुझुकी कंपनीची सर्वात लोकप्रिय स्विफ्ट कारमध्ये देखील ESC हे फीचर्स देण्यात येत आहे. या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल-होल्ड कंट्रोल आणि रियर पार्किंग सेन्सर्स देखील मिळतात. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपये आहे.
Nissan Magnite
Nissan Magnite या कारमध्ये देखील अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये देखील ESC वैशिष्ट्य देण्यास सुरुवात केली आहे. कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख ते 10.94 लाख रुपये आहे.